Baramati News l वाणेवाडीच्या अजय भोसलेचा ऑस्ट्रेलियात डंका : पॅरास्विमिंग वर्ल्ड सिरीजमध्ये रौप्यपदक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
बारामती : प्रतिनिधी
2026 पॅरा-स्विमिंग वर्ल्ड सिरीज ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा Para Swimming World Series Australia अंतर्गत क्वीन्सलँड येथील Gold Coast Aquatic Centre येथे 20 ते 22 जानेवारीदरम्यान पार पडत आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील अजय हिंदुराव भोसले याने S10 कॅटेगरीतील मिश्र रिले 4×100 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात आपल्या तीन सहकाऱ्यांसह रौप्यपदक पटकावत भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले आहे.
भारताबाहेर मिळालेले अजयचे हे पहिलेच मोठे यश ठरले आहे. या यशामागे पुणे येथील Deccan Aquatic Clubचा मोलाचा वाटा असून प्रशिक्षक स्वोजस गोडसे व शौर्य करंदीकर यांचे मार्गदर्शन तसेच पॅराऑलिम्पिक पटू सुयश जाधव यांची मोलाची साथ निर्णायक ठरली आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल वाणेवाडी गावात आनंदाचे वातावरण असून साद संवाद स्वच्छता ग्रुप, वाणेवाडी यांच्या वतीने अजय भोसले याचे अभिनंदन करण्यात आले आहे.
To Top