सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यात सन १९९५ मध्ये शिवसेनेने मिळविलेल्या विजया नंतर कुसुंबी गटामधील मिळालेला विजय हा शिवसेनेला उर्जा देणारा विजय ठरला असल्याने राज्याचे उपमुखमंत्री तथा शिवसेनेचे सर्वासर्वे ना. एकनाथजी शिंदेनी एकनाथ ओंबळेंना जावलीत भगव्याची उंची तुम्ही वाढविली अशा शब्दात शाब्बासकीची थाप देवुन जावलीच्या विकासात नाथांना साथ देण्याचे आश्वासन दिले.
कुसुंबी गटामध्ये शिवसेनेने मिळविलेल्या विजयामुळे एकनाथ ओंबळे, जिप सदस्या सौ. कविता ओंबळे आणि कार्यकर्ते ना. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान सर्व सामान्य जनतेची नाळ असलेल्या एकनाथ ओंबळेंनी कविता ओंबळेंना जिल्हा परिषद कुसुंबी गटातुन उभे करून कार्यकत्यांच्या जिद्दीवर आणि मतदारांच्या विश्वासावर विजयी केले. त्यामुळे ना. एकनाथ शिंदेंनी कौतुकाची थाप एकनाथ ओंबळेंच्या पाठीवर दिली. यावेळी जावली तालुक्यातील पर्याटण, रस्तेविकास, पाणीपुरवठा योजना, रोजगार निर्मिती, आरोग्य, महिला सक्षमकिरण या मुद्दयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या जिद्दीमुळे भगवा उंचावतो असे सांगत उपमुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई संपर्क प्रमुख व नगरसेवक अंकुशबाबा कदम, एकनाथ ओंबळे तसेच शिवसैनिकांचे कौतुक केले.
यावेळी भेटी दरम्यान तालुका प्रमुख समीर गोळे, उपतालुका प्रमुख नंदु गोरे, सचिन शेलार, वैदकीय मदत कक्ष प्रमुख प्रशांत जुनघरे, सुधीर करंदकर, विजय धनावडे, दत्ता ओंबळे, प्रणव सावले, संदिप कासुर्डे आणि बाळासाहेब शिर्के आदी उपस्थित होते.
