सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
कुरंगवडी ता.भोर येथे धान्य भरडणी यंत्रात स्कार्फ अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. २१ सकाळी घडली.
शुभांगी निलेश राउत (वय ४१, रा. कुरंगवडी, ता. भोर) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत जयेंद्र सुरेश राउत यांनी राजगड पोलीस ठाण्यात खबर दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभांगी राउत सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतात धान्य भरडण्याचे काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ धान्य भरडणी यंत्रात अडकला. त्यामुळे त्या चालू मशीनमध्ये ओढल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या.घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना भरडणी यंत्रामधून बाहेर काढून उपचारासाठी नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार मयूर निंबाळकर करीत आहेत.
