Bhor Breaking l एकीकडे आई-वडील ऊस तोडतात...! दुसरीकडे पाच वर्षांच्या कृष्णाला वन्यप्राण्याने फरफटत नेले : भोर तालुक्यातील हृदय पिळावून टाकणारी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर ; संतोष म्हस्के
पुणे- सातारा महामार्ग शेजारील किकवी- केंजळ ता.भोर गावच्या हद्दीतील शिवारात ऊसतोड कामगार ऊस तोडणी करीत होते.यावेळी ऊसतोड कामगारांचा  ५ वर्षाचा चिमुकला खेळत असताना वन्यप्राण्यांनी हल्ला करून जखमी केले.या घटनेत कृष्णा किरण सोनवणे (वय- ५)रा. पिंपरखेड ता.चाळीसगाव याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
       नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा किरण सोनवणे याचे आई-वडील तसेच इतर कामगार केंजळ येथील शिवारात ऊस तोडणी करीत होते. यावेळी कृष्णा पाठीमागील बाजूस खेळत होता.काही वेळाने कृष्णा दिशेनेसा झाल्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली.बराच वेळ कृष्णाची शोधाशोध करूनही कृष्णा सापडला नसल्याने नातेवाईक तसेच आई-वडिलांनी आजूबाजूला पाहिले असता कृष्णा जखमी अवस्थेत आढळून आला.कृष्णाला वन्यप्राण्याने पळून नेऊन गंभीर जखमी केले असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आल्याने तात्काळ नातेवाईकांनी चिमुकल्याला भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र उपचारापूर्वी कृष्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.कृष्णाच्या अंगावर तसेच गळ्यावर वन्यप्राण्याने गंभीर जखमा केल्याचे समोर आले. 

कृष्णा खेळताना कुठे गेला कळलेच नाही.....
       ऊसतोड करीत असताना कृष्णा आमच्या पाठीमागील बाजूस खेळत होता.काही वेळातच कसलाच आवाज नाही काही नाही.मात्र कृष्णा दिसेनासा झाला.शोधा शोध केली.कृष्णा खेळताना कुठे गेला कळलेच नाही.अचानक जखमी अवस्थेत कृष्णा आढळला.उपचारासाठी कृष्णाला दवाखान्यात गेले.मात्र डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगताच नातेवाईक तसेच वडिलांनी सुन्न होऊन टाहो फोडला.
To Top