सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यात म्हसवे, कुडाळ आणि कुसुंबी या गटांसाठी ६२ टक्के मतदान झाले असून म्हसवे गटातील खर्शी बारापुरे गण आणि म्हसवे गण, कुडाळ गटामध्ये कुडाळ गण आणि सायगाव गण, तर कुसुंबी गतमध्ये आंबेघर तर्फ मेढा गण आणि कुसुंबी गण असे गण आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मतदार संघ असल्याने आणि शिवसेना, राष्ट्रवादी यांनी एकत्र येवुन भाजपला तगडे आव्हान उभे केल्याने संपूर्ण जिल्हयाचे लक्ष अति तटीच्या निकालाकडे लागले आज १ वाजे पर्यत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायात समिती गणांमध्ये सकाळपासुनच मतदारांनी मतदान करण्यासाठी सहभाग नोंदविला होता. सकाळच्या सत्रात मतदानामध्ये कमी टक्के मतदार झालेचे दिसुन आले असले तरी नंतरच्या सत्रात चांगला प्रतिसाद मिळेला दिसून आला आहे.
म्हसवे गटामध्ये शिवसेना पक्षातर्फे संदिप पवार, भाजप पक्षातर्फे वसंतराव मानकुमरे आणि अपक्ष संतोष शिराळे, कुडाळ गटामध्ये भाजप तर्फे जयश्री गिरी, राष्ट्रवादी तर्फे पूनम नायकुडे आणि अपक्ष जयश्री शेवते, कुसुंबी गटामध्ये शिवसेनेच्या कविता ओंबळे, भाजपच्या अर्चना रांजणे आणि अपक्ष कल्पना पार्टे, खर्शी बारामुरे गणामध्ये राष्ट्रवादी (शप ) पक्षाचे विठ्ठल गोळे, भाजपा तर्फे गोरखनाथ महाडीक, अपक्ष किरण गायकवाड, म्हसवे गणामध्ये रेश्मा पोफळे भाजप, शिल्पा शिंदे राष्ट्रवादी ( शप ), अपक्ष संगीता भिसे, कुडाळ गणामध्ये प्रशांत तरडे हे शिवसेना (उबाठा ), राजेंद्र शिंदे हे राष्ट्रवादी ( श प ), सौरभ शिंदे भाजप तर अपक्ष राजेंद्र शेवते, सायगाव गणामध्ये साक्षी देशमुख या राष्ट्रवादी ( शप ) चारुशिला पवार या भाजप, आंबेघर तर्फ मेढा गणामध्ये आतिश कदम शिवसेना, विजय सपकाळ भाजप, कुसुंबी गणामध्ये पुष्पा चिकणे भाजप, सुनिता चिकणे या सर्वांचे भविष्य आजच्या निकालाने ठरणार आहे.
तालुक्यातील तीन गटामधील म्हसवे गटामध्ये ७१ खर्शी बारामुरे गणात १३ हजार ५२७ मतदारांपैकी ८ हजार ३२५ मतदारांनी, ७२ म्हसवे गणात १५ हजार ५११ मतदारांनी, कुडाळ गटामध्ये ७३ कुडाळ गणासाठी १४ हजार ७३९ मतदारांपैंकी ९ हजार २६२ मतदारांनी, ७४ सायगाव गणासाठी १८ हजार ३४६ मतदारांपैकी १० हजार ४६८ मतदारांनी, ७५ आंबेघर तर्फ मेढा या गणामध्ये १४ हजार ८७८ मतदारांपैकी ९ हजार ७४४ मतदारांनी आणि कुसुंबी गणामध्ये १५ हजार मतदारांपैकी ८ हजार १६६ मतदारांनी मतदानामध्ये सहभाग नोंदविला आहे.
तर कुसुंबी गटासाठी २९ हजार ८७८ मतदारांपैकी १७ हजार ९१०, म्हसवे गटामध्ये २९ हजार ३८ मतदारांपैकी १८ हजार ६ मतदारांनी तर कुडाळ गटामध्ये ३३ हजार ८५ मतदारांपैकी १९ हजार ७३० मतदारांनी मतदान केले आहे.
तीन गटासाठी व सहा गणांसाठी काही किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न होण्यासाठी सपोनि सुधीर पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
