Bhor Breaking l धोम-बलकवडी डाव्या कालव्यात ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला : चिखलगाव- रावडी परिसरात एकच खळबळ

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
आंबवडे खोऱ्यातून पूर्वेकडील बाजूस गेलेल्या धोम - बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात रावडी ता.भोर हद्दीत एका तरुण महिलेचा मृतदेह कालव्यात वाहून जात असल्याचा प्रकार समोर आले. बेवारस मृतदेह पाण्यात वाहून चालल्याची स्थानिकांनी तात्काळ भोर पोलिसात माहिती दिली.भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू केली.
      स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार धोम- बलकवडी धरणाच्या कालव्यातून चिखलगाव- रावडी हद्दीत एका ३० वर्षीय महिलेचा मृतदेह वाहून जात असल्याचे स्थानिकांना आढळले.महिलेचा मृतदेह चिखलगाव (धोंडेवाडी) ता.भोर येथीलच असून या महिलेला करंदी( कांबरे )ता.भोर येथे दिल्याचे प्रथमदर्शनी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.भोर पोलिसांनी स्थानिक तसेच पोलीस पाटील यांच्या मदतीने कालव्यातून मृतदेह बाहेर काढून तपास काम सुरू केले.यावेळी पोलीस निरीक्षक अण्णा पवार, सहाय्यक फौजदार यशवंत शिंदे तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top