Bhor News l पोलीस असल्याची बतावणी करत जेष्ठाला लुटले : साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
पुणे- सातारा महामार्गावरील ससेवाडी ता.भोर येथे एक जेष्ठ लघुशंकेसाठी थांबलेला असताना मी पोलीस आहे.रस्त्यावर तपासणी सुरू आहे.
तुमच्याकडे सोने- नाणे काही असेल तर या कापडात बांधून ठेवा खिशात ठेवा असे म्हणून ८ तोळ्यांची चैन व २ तोळ्यांची अंगठी स्वतःकडे घेतली.दरम्यान चैन व अंगठी कापडात न बांधता त्याने ज्येष्ठाला फसवून ओळ काढला.या घटनेत चोरट्याने ५ लाख ५८ हजार १७० रुपयांचे दागिने लंपास केले.याची फिर्याद बाळासाहेब ज्ञानोबा धुमाळ (वय ६५ )रा.एनडीए रोड उत्तम नगर पुणे यांनी राजगड पोलिसात दिली.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ससेवाडी ता. भोर येथील गावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला बाळासाहेब ज्ञानोबा धुमाळ ज्येष्ठ नागरिक मंगळवार दि.२४ लघुशंकेसाठी उभे होते.यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने पोलीस असल्याचे बतावणी केली.येथे पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.तुमचे दागिने कापडात बांधून खिशात ठेवा असे सांगून ज्येष्ठाचे ८ चोळी ९०० ग्रॅमची ४ लाख ५९ हजार १७० रुपयांची चैन व २ तोळे २०० ग्रॅमची ९९ हजारांची सोन्याची अंगठी असे एकूण ११ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.या घटनेत ज्येष्ठाचे साडेपाच लाखांचे नुकसान झाले. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

                                    
To Top