सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
शिरवळ पोलीस ठाणे, जि. सातारा यांच्या पथकाने खंडाळा तालुक्यातील भादे गावाच्या हद्दीतील सिद्धेश्वर मंदिराजवळील गायकवाड मळा शिवारात मोठी कारवाई करत प्रतिबंधित अफिम (खसखस) उत्पादन करणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीस अटक केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी दोन ठिकाणी लागवड केलेली अफिम सदृश आमली पदार्थाची ओलसर व वाळलेली झाडे जप्त केली असून एकूण ७ किलो ९१५ ग्रॅम वजनाचा व सुमारे १ लाख ९७ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भादे (ता. खंडाळा) येथील जमीन गट क्रमांक ४८० मध्ये अफिम (खसखस) झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांना मिळाली होती. ही माहिती फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांना कळवून फॉरेन्सिक पथक व शासकीय पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. छाप्यात आरोपीने त्याच्या मालकीच्या दोन वेगवेगळ्या शेतांमध्ये अफिम सदृश झाडांची लागवड केल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत खंडाळा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांच्या समक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) कलम ८(क), १७(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडाळा न्यायालयाने आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची फिर्याद पोलीस अंमलदार अक्षय बगाड यांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे करीत आहेत.
सदर कारवाई सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर व फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिरवळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत अमली
