सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी मूलभूत सेवा व सुविधा निर्माण करा अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, याबाबतचे निवेदन नुकतेच आमदार शंकर मांडेकर यांना जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की किल्ले राजगड हा जागतिक वारसा म्हणून नोंद झालेली आहे त्यामुळे किल्ल्यावर पर्यटक यांचे संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे परंतु किल्ल्यावर असणाऱ्या सेवा सुविधा अपूर्ण व अर्धवट असल्यामुळे नाराज होत आहेत, राजगड किल्ला हा ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा वारसा स्थळ आहे. किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. मात्र, सद्यस्थितीत तेथे आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्यामुळे किल्ले राजगडावर जीपीएस व मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करणे,राजगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व पायवाटांतर दिशादर्शक फलक लावणे,
किल्ले परिसरात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था करणे, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या ठिकाणी मजबूत रेलिंगची व्यवस्था करणे.किल्ल्यावर अधिकृत व प्रशिक्षित पर्यटक मार्गदर्शक (गाईंड) नेमणे.
राजगड पायथ्याशी असलेल्या गावांची समन्वय बैठक आयोजित करून स्थानिक सहभाग वाढवणे. किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटा सुरक्षित व दुरुस्त करून संरक्षित करणे.पिण्याच्या पाण्याची शुद्ध (फिल्टरयुक्त) व्यवस्था उपलब्ध करणे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व सुसज्ज वैद्यकीय किट व प्राथमिक उपचार केंद्राची व्यवस्था करणे. आधी मागणे या पत्रद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली आहे.
