सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर (भाग शाळा करंजे) येथील आदर्श शिक्षिका संगीता रामराजे यादव या सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्त होताना यादव यांनी शाळेला एक लाख रुपयांची मदत दिली.
या नियत वयोमानानुसार दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्या. गणित व विज्ञान या विषयांचे प्रभावी अध्यापन करत त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. आपल्या अध्यापनकाळात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि जिज्ञासा वाढविण्याचे कार्य केले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. शाळा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची जिव्हाळ्याची बांधिलकी सेवानिवृत्तीनंतरही कायम राहिली. ग्रंथालय अधिक सुसज्ज व्हावे, प्रयोगशाळा अद्ययावत व्हावी तसेच गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना मदत मिळावी या हेतूने त्यांनी संस्थेस एक लाख रुपयांची देणगी दिली. तसेच भाग शाळा करंजेच्या ३०० विद्यार्थीना शाळापयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे तसेच संस्थेचे सचिव भारत खोमणे, प्राचार्य पी बी जगताप यांनी त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
