Baramati News l वडिलांचे आकस्मित निधन : संस्थेकडून अनुकंपा तत्वावर मुलाची नेमणूक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
 श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अनुकंपा तत्त्वावर आकाश सुनील पाटोळे यांची शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. टेक्निकल विभागात कार्यरत असलेले सुनील पाटोळे यांचे दि. २३ एप्रिल २०२५ रोजी निधन झाले होते. 
          त्यांच्या पश्चात कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर अनुकंपा तत्त्वानुसार त्यांच्या मुलगा आकाश पाटोळे यांना शैक्षणिक सेवेत संधी देण्यात आली. पुणे जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून नुकतीच या नियुक्तीची अधिकृत आदेशपत्र देण्यात आली. संस्थेने सातत्याने पाठपुरावा करून कुटुंबाला आधार देण्याचे कार्य केले. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे तसेच संस्थेचे सचिव भारत खोमणे, प्राचार्य पी बी जगताप यांनी आकाश पाटोळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनुकंपा तत्त्वावर मिळालेल्या या संधीमुळे पाटोळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
To Top