Baramati News l सिल्वर झोन विज्ञान स्पर्धा परीक्षेत शिवकन्या तांबे व युवराज राजपुरे या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणी भापकर : प्रतिनिधी
 मुर्टी (ता.बारामती) येथील शिवकन्या हनुमंत तांबे व युवराज राजपुरे या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सिल्वर झोन इंटरनॅशनल ओलंपियाड (कॉम्पिटिटिव्ह) स्पर्धात्मक सायन्स परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
 सिल्वर झोन फाउंडेशन, नवी दिल्ली व कडेपठार रुरल मेडिकल & रिसर्च फौंडेशन, जेजुरी संचलित इंदु इंग्लिश स्कूल, कोळविहिरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सिल्वर झोन इंटरनॅशनल ओलंपियाड (कॉम्पिटिटिव्ह) स्पर्धात्मक सायन्स परीक्षा २०२५-२०२६ या विज्ञान स्पर्धा परीक्षेत मुर्टी येथील शिवकन्या हनुमंत तांबे व युवराज राजपुरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑलिम्पियाड विभागात प्रथम क्रमांक मिळवला. 
या यशासाठी विद्यार्थ्यांना निलम कुंभार मॅडम यांचे मार्गदर्शन तसेच त्यांच्या पालकांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले. विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून शंभर पैकी शंभर मार्क मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धा परीक्षेत शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत हे यश मिळवले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या यशाबद्दल शिवकन्या तांबे हिचे मुर्टी, मोढवे, मोराळवाडी, पळशी, जोगवडी, कोळविहिरे, जेजुरी परिसरातून विशेष कौतुक होत आहे. विज्ञान विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी तसेच त्यांची बौद्धिक क्षमता व स्पर्धात्मक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते. या स्पर्धेत इंदु इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
  
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थापिका श्रीमती इंदुमती कुटे, संस्थापक अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, सचिव डॉ. मोनाली कुटे, डॉ. संजय सावंत, प्राचार्य पुरुषोत्तम रोटे सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
To Top