Rajgad News l राजगड पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा राऊत तर उपसभापतीपदी संदिप खुटवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा राऊत , उपसभापतीपदी संदिप खुटवड यांची बिनविरोध निवड झाली. 
राजगड तालुका पंचायत समितीच्या सभागृहात आज सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली . राजगड तालुका निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमिता तळेकर , तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. 
सभापती पदासाठी सुवर्णा राऊत, उपसभापती पदासाठी संदिप खुटवड यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अमिता तळेकर यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. 

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण शिंदे , जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे , तानाजी मांगडे, पंचायत समिती सदस्या सीता खुळे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राऊत , आनंद देशमाने, माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, अंकुश दसवडकर , रमेश शिंदे, संतोष रेणुसे, प्रमोद लोहकरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top