Baramati News l सोमेश्वरनगरच्या 'शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट'मधील १५६ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट; नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमेश्वरनगर या महाविद्यालयातील डिप्लोमा अंतिम वर्षातील तब्बल १५६ विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे या निवडींमधून स्पष्ट झाले आहे.
टीई कनेक्टिव्हिटी इंडिया प्रा. लि., शिरवळ-खंडाळा येथे इलेक्ट्रिकल विभागातील २० व मेकॅनिकल विभागातील ३५ अशा ५५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक सुमारे २.४ लाख रुपयांच्या पॅकेजवर ट्रेनी इंजिनिअर पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ओम व्ही सॅव आयटी सोल्युशन प्रा. लि., पुणे येथे कॉम्प्युटर विभागातील १० विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना सुमारे १.४ लाख वार्षिक पॅकेजवर सॉफ्टवेअर ट्रेनी इंजिनिअर पद देण्यात आले. तसेच वाय एसएसएस इन्फोटेक प्रा. लि., पुणे येथे ५ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना सुमारे १ लाख वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे. बजाज ऑटो लि., चाकण येथे इलेक्ट्रिकल विभागातील २१ व मेकॅनिकल विभागातील २४ अशा ४५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना सुमारे २.०४ लाख वार्षिक पॅकेजवर ट्रेनी इंजिनिअर म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

मोना अलॉइड्स प्रा. लि., लोणंद येथे ७, भारत गिअर्स लि., लोणंद येथे १७ तर पियाजिओ कंपनीत मेकॅनिकल १९ व इलेक्ट्रिकल १८ अशा ३७ विद्यार्थ्यांची निवड झाली असून या सर्वांना सुमारे १.९ ते २.४ लाख वार्षिक पॅकेजवर ट्रेनी इंजिनिअर पदावर संधी मिळाली आहे. दरम्यान, द्वितीय वर्षातील ९३ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये तीन महिन्यांच्या औद्योगिक प्रशिक्षणासाठी निवड झाली असून त्यांना दरमहा १२ ते १७ हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी समाधान व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष श्री. मिलिंद कांबळे, श्री. राजवर्धन शिंदे, श्री. आनंदकुमार होळकर, श्री. सुनिल भगत, श्री. शैलेश रासकर, श्री. लक्ष्मण गोफणे, श्री. ऋषिकेश गायकवाड, श्री. हरीभाऊ भोंडवे, श्री. अनंत तांबे, श्री. रणजित मोरे, श्री. किसन तांबे, श्री. जितेंद्र निगडे, श्री. तुषार माहुरकर व सर्व संचालक मंडळ, सचिव भारत खोमणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्लेसमेंटसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ हजारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अमरजीत घाडगे, विभाग प्रमुख विवेक भापकर, रोहिणी घारे, ज्योती खरात तसेच तुषार गावडे, मोरेश्वर भोईटे आणि राहुल कदम यांनी विशेष प्रयत्न केले.
To Top