Javali News l भाऊसाहेब चॉरिटेबल ट्रस्टच्या वतीने किर्तनकारांचा भव्य नागरी सत्कार सोहळा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
मेढा : सोमनाथ साखरे 
जावली, सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यातील किर्तनकार महाराज यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यासह भजनी मंडळे यांना भजनासाठी लागणारे साहित्य वाटप कै. अभयसिंहराजे भोसले वारकरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार असल्याचे माजी सभापती सुहास गिरी व माजी जि.प. सदस्य मछिंद्र क्षिरसागर यांनी सांगीतले.
भणंग ता. जावली येथिल माऊली मंगल कार्यालय येथे दि. १३ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जि.प. सदस्य वसंतराव मानकुमरे, सौ. जयश्रीताई गिरी , सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडीक आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांप्रदायिक कार्य करणाऱ्या किर्तकारांचा तसेच भजनी मंडळांचा सत्कार सोहळा भाऊसाहेबांच्या पुण्यतिथीला साजरा करण्याचे ठरविले होते. परंतु अनेक वेळा काही अडचणी मुळे हा कार्यक्रम करण्यात अडचणी येत होत्या. महाराज साहेबांचा मोठा कार्यक्रम ११ गावांच्या वतीने करण्याचे राहून गेले होते. त्यामुळे हा कार्यक्रम ११ गावांच्या वतीने आयोजित केला असून यामध्ये साधारण दहा लाख रुपयांचे साहीत्य वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील अतुल महाराज, प्रविण महाराज, चैतन्य महाराज आदींच्या वारकरी शिक्षण संस्थांचा सुद्धा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

यावेळी संजय निकम, पांडुरंग वाघ, सुरेश बुवा जवळ, सतिश मर्ढेकर, अजित मर्ढेकर आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मछिंद्र क्षिरसागर तर आभार सतिश मर्ढेकर यांनी मानले.
To Top