Baramati News l बारामतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त बारामती शहरात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय समारंभात उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकावून त्यांनी तिरंग्याला मानवंदना दिली. या सोहळ्याला बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील आणि तहसीलदार स्वप्नील रावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला बारामती परिसरातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, नगरसेवक, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने राष्ट्रगीत गाऊन राज्याच्या वैभवशाली परंपरेला अभिवादन केले.

प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेला हा सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्याच्या प्रगतीत आपला सहभाग नोंदवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
To Top