Baramati News l नोकरीच्या तणावातून ‘शिक्षकाची’ आत्महत्या : मोरगाव-सुपा रस्त्यावरील लॉजवर संपवले जीवन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
 मोरगाव- सुपा रोडवरील एका खाजगी हॉटेलमधील एका खोलीत शनिवारी नोकरीच्या तणावातून एका शिक्षकांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. मृत शिक्षक हे दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा गावचे रहिवासी आहेत. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. 
        याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष विठ्ठल रोंघे वय - 47 वर्ष राहणार पारगाव सामा ता. दौंड जिल्हा पुणे हे या घटनेत मृत्यू पावले आहेत. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीवरून संतोष रोंघे हे रयत शिक्षण संस्था अंतर्गत हडपसर पुणे येथे नोकरी करत होते. येथील नोकरीच्या ठिकाणी असलेल्या मानसिक तणावातून ते सतत वावरत होते. या शाळेतून काही किरकोळ कारणावरून यांची मेढा जिल्हा सातारा येथे बदली करण्यात आली. यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची सतत भावना त्यांच्या मनात होती.                                                             
    याच कामाच्या तणावातून काही दिवसांपूर्वी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मयत संतोष रोंघे यांना वाटत असलेले अन्यायकारक बदली पारगाव सामा प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रद्द करून काष्टी ता श्रीगोंदा येथे पुनर स्थापित करण्यात आली होती. यामुळे अवघ्या एक तासाच्या अंतरावर काम करण्याची संधी मिळाली होती. घटनास्थळावर मृत्यूपूर्वी लिहिलेल पत्र अथवा आत्महत्या कारण स्पष्ट झाले नाही. सुपे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
To Top