Rajgad Breaking l मिनल कांबळे l थोरल्या भावाला वाचवायला गेलेल्या धाकट्या भावसह दोघांचा बुडून मृत्यू : गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटरमधील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे
शेतीपंपाची दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा गुंजवणी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राजगड तालुक्यातील घेवंडे गावात ही घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी नदीपात्रात पाण्याची मोटार बसवताना अचानक शॉक लागून दोन सख्ख्या शेतकरी भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दत्तू भाऊ गायकवाड (वय ५५) आणि दामाजी भाऊ गायकवाड (वय ५०) अशी मृत्यू झालेल्या दोन सख्ख्या भावांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या गुंजवणी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने बॅकवॉटर परिसरातील शेतीचे विद्युत पंप उघडे पडले आहेत. पिकांना पाणी मिळावे यासाठी हे शेती पंप अधिक खोल पाण्यात नेऊन ठेवण्यासाठी दोन्ही भाऊ धरणाच्या परिसरात गेले होते. पंप पाण्यात सरकवत असताना मोठ्या भावाचा (दत्तू गायकवाड) अचानक तोल गेला आणि ते पाण्यात पडले. भाऊ बुडत असल्याचे पाहून लहान भाऊ दामाजी गायकवाड यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही सख्खे भाऊ पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. राजगड आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमला तातडीने पाचारण करण्यात आले. सुमारे ६ ते ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर लहान भाऊ दामाजी गायकवाड यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

मात्र, रात्री उशिरापर्यंत मोठा भाऊ दत्तू गायकवाड यांचा मृतदेह मिळून न आल्याने अखेर 'स्कुबा डायव्हर्स'च्या पथकाला पाचारण करण्यात आले. अंधारामुळे शोधमोहिमेत अडथळे येत होते, तरीही रात्री उशिरापर्यंत काम सुरू असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.

पाणी कमी झाल्यामुळे अनेक शेतकरी जीवाची पर्वा न करता विद्युत पंप पाण्यात ओढण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी धरणाच्या पात्रात उतरतात. कोणतीही पुरेशी सुरक्षा साधने सोबत नसताना पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
To Top