सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम (साळोबावस्ती) येथील लक्ष्मण जयसिंग खोमणे (वय ६५) यांचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते करंजेपूल येथील निरा डाव्या कालव्यावर आंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून ते पाण्यात वाहून गेले.
घटनेनंतर रात्रीपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर मंगळवारी दुपारी शेंडकरवाडी जवळील चार मोरी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चयात आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष युवराज खोमणे यांचे ते चुलते होत.
