सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यात विकास कामे होत असताना दळणवळण महत्वाचा भाग असतो. वेण्णा नदी पलीकडील गावांना जाण्यासाठी मेढयाकडून जावे लागते. त्या साठी वेळ, खर्च वाया जातो म्हणून रिटकवली ते काळोशी हा वेण्णा जलाशयावर नविन लवकरच उभारणी करण्याचे काम हाती घेत आहोत. या पुलामुळे पलीकडील गावांचा संपर्क वाढून त्यांना त्याचा फायदा होईल असे सांगुन जिल्हा परिषदेत विविध पदांच्या निवडी झाल्या. सर्व निवडी संघर्षातून झाल्या त्यामुळे ताई आपणाला न्याय देता आला नाही परंतु आपण पाच वर्षे जिल्हा परिषदेत आहात त्यामुळे जयश्रीताई आपला योग्य तो सन्मान केला जाईल असा शब्द देतो असे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगीतले.
भणंग ता. जावली येथे सापंद्रायिक काम करणाऱ्या व्यक्तींचा व भजन मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम कै. अभयसिंहराजे भोसले सांप्रदायिक ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होते तर माजी आ. सदाशिव सपकाळ, जि.प. सदस्य वसंतराव मानकुमरे, जयश्री गिरी, नगराध्यक्ष रुपाली वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे, माजी सभापती सुहास गिरी, सा. जि. मध्य. बॅकेचे संचालक ज्ञानदेव रांजने, प्रतापगड कारखाना व्हा.चेअरमन ॲड शिवाजीराव मर्ढेकर, मच्छींद्र क्षिरसागर, मच्छींद्र मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. शिवेंद्रसिंहराजे भासले म्हणाले की, वारकरी हे समाज प्रबोधनाचे काम करतात. अनेक वर्षे सुहास गिरी हे सांप्रदायिक कार्यात काम करत असतात. वारकऱ्यांना या कुटुंबीयांच्यावतीने साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे सर्व वारकऱ्यांचा सन्मान व्हावा असे सांगुन मी वारकऱ्यांच्या शंभर टक्के पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पुढे म्हणाले समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम संतांनी केले आहे. किर्तन, भजन यांच्यातुन सर्व जण एकत्र येतात त्यामुळे जाती, धर्म, भाषा यांच्यातील दुरावा दुर होतो असे सांगुन छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महारांजांचा किर्तनात जात होते त्यांचे दर्शन घेत होते. शक्ती आणि भक्तींचा संगम होता असे ना. भोसले यांनी सांगीतले.
जावली तालुक्यातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन बांधण्याची मागणी रास्त आहे आणि ती बांधण्याचा मी शब्द देतो परंतु त्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन लागणारा निधी मिळवून देण्याचे मान्य करून देण्याचे वचन उपस्थित वारकऱ्यांना ना. भोसले यांनी दिले.
यावेळी माजी सभापती सुहास गिरी यांनी सांप्रदायिक काम करणाऱ्या किर्तन करणाऱ्या महाराजांचे आणि भजन मंडळांचा सन्मान व साहित्याचे वाटप करताना आनंद होत असल्याचे सांगुन प्रतिवर्षी वारकर्यांना सहकार्य करण्याचे वचन गिरी कुटुंबीयांचे वतीने देत असल्याचे सुहास गिरी यांनी सांगीतले. तसेच बाबारांजेनी आम्हा दोघा उभयतांना सभापती केले. भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे आता आम्हाला कशाची अपेक्षा नाही. बाबा आम्ही सदैव तुमच्या सोबत राहु असे वचन मी देतो असेही सुहास गिरी म्हणाले.
