सोमेश्वरच्या ‘विवेकानंद अभ्यासिकेचा’ जिल्ह्यात डंका; पुणे शहर पोलीस दलात २२ तरुणांची भरती..!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुणे शहर पोलीस शिपाई भरतीमध्ये सोमेश्वर परिसरातील विवेकानंद अभ्यासिकेने घवघवीत यश संपादन केले आहे. या अभ्यासिकेतील तब्बल २२ मुला-मुलींची पुणे शहर पोलीस दलात निवड झाली असून, या यशाने सोमेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
पुणे शहर पोलीस दलाच्या १७३३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये गणेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या 'सोमेश्वर पॅटर्न'ने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. 
यशस्वी उमेदवारांमध्ये मुलांसोबतच मुलींनीही मोठी झेप घेतली असून, दोन सख्या बहिणींनी एकत्र खाकी वर्दीचे स्वप्न साकारले आहे. विशेष म्हणजे दोन माजी सैनिकांनीही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून पोलीस दलात स्थान मिळवले आहे.

यशस्वी उमेदवारांचे गुणतालिका खालीलप्रमाणे-
सागर माने (१३७), सचिन निमगिरे (१३६), सिद्धेश पवार (१३४), विशाल कोकरे (१३४), अभी लाळगे (१३२), अक्षय सापटे (१३२), सोमनाथ निकम (१३१), स्वप्नील जाधव (१२९), प्रज्वल जगताप (१२६), मयूर गिते (१२२), भीमा मदने (१२०), पोपट पाटोळे (११७), किरण लकडे (११३) आणि रामदास दुबे (१११)
कीर्ती गायकवाड (१३१), निकिता सोडमिसे (१२८), ऋतुजा कोकरे (१२७), निकिता मारकड (१२५), समीक्षा होळकर (१२५), साक्षी शेंडकर (१२४), प्राजक्ता बोडरे (१२४) आणि मिथाली सोडमिसे (१२०).

यातील अनेक तरुणांनी वयाच्या अवघ्या १९ व्या आणि २० व्या वर्षीच पोलीस होण्याचा मान मिळवला आहे. एकाच अभ्यासिकेतून इतक्या मोठ्या संख्येने मुलांची निवड झाल्याने पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विवेकानंद अभ्यासिकेचा हा 'सोमेश्वर पॅटर्न' आता पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे.
Tags
To Top