सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : सोमनाथ साखरे
मेढा- सातारा येथील श्री पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट राजवाडा सातारा व रोटरी क्लब ऑफ सातारा तर्फे डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या सीएसआर फंडातून शव शीतपेटी लोकार्पण सोहळा सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते उपाध्यक्ष ऍड डी. जी. बनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी भारती शिंदे, स्मिता घोडके, सौ शहाणे, किशोर शिंदे, धनंजय जांभळे, तसेच रोटरी क्लब चे किशोर डांगे, अभिजीत लोणकर, मनोज गायकवाड, ऍड. सुधीर साळुंखे, धनंजय देवी, श्रीकांत निकम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक व रोटरीच्या पदाधिकारी यांचे स्वागत ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहीते यांनी ट्रस्टच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच आज एक ते दोन ठिकाणी च संपूर्ण साताऱ्यात ही सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच ट्रस्टला नगर पालिकेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपनगाराध्यक्ष ऍड. डी. जी. बनकर यांनी ट्रस्टने राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या शीत शव पेटी ठेवण्यासाठी ट्रस्टीने केलेल्या जागेच्या मागणी साठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. साताऱ्यात अश्या या उपक्रमाची गरज होतीच असेही यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले व ट्रस्टला भावी वाटचालीस उपनगाराध्यक्ष ऍड. डी. जी. बनकर शुभेच्छा दिल्या.
या लोकार्पण सोहळ्याप्रसगी पंचपाळी दुर्गामाता मंदिराचे धनंजय देशमुख, शिवाजी तुपे, दिलीप आफळे, विशाल चव्हाण-शिंदे, रवी दिवटे, चंद्रशेखर ढाणे, हरिष शेठ, जयंत देशपांडे, प्रसाद चौधरी, राजेंद्र महाडिक, अजित सुपेकर, विकी भोसले, हिमांशू निकम, पुष्कर शेलार, तेजस जाधव, विलास सोळके, साळवी, संजय गोसावी आदी उपस्थित होते.या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ट्रस्टच्या वतीने चंद्रशेखर ढाणे सर यांनी आभार मानले.
