सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर दि.१२ वाळुंज (ता. पुरंदर) येथील तान्हुबाई रामचंद्र इंगळे (वय ७५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दीर, दोन मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र दत्तात्रेय इंगळे यांच्या त्या पत्नी होत. तर पुरंदर पंचायत समिती माजी उपसभापती रंजना कुंभारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. रमेश (आबा) इंगळे व अभिमन्यू फ्लेक्स प्रिंटिंग सासवडचे मालक म्हस्कु (दादा )इंगळे यांच्या त्या मातोश्री होत.
