सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील तिघांनी पोलीस भरतीत यश मिळवले असून कीर्ती प्रकाश गायकवाड व साक्षी संदीप संदीप शेंडकर यांची पुणे शहर पोलीस दलात तर मयूर गायकवाड याची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुणे शहर पोलीस शिपाई भरतीमध्ये सोमेश्वर परिसरातील तब्बेल २५ मुलांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विवेकानंद या अभ्यासिकेतील तब्बल २२ मुला-मुलींची पुणे शहर पोलीस दलात निवड झाली असून, या यशाने सोमेश्वर परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
पुणे शहर पोलीस दलाच्या १७३३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये गणेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या 'सोमेश्वर पॅटर्न'ने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. यशस्वी उमेदवारांमध्ये मुलांसोबतच मुलींनीही मोठी झेप घेतली असून, दोन सख्या बहिणींनी एकत्र खाकी वर्दीचे स्वप्न साकारले आहे. विशेष म्हणजे दोन माजी सैनिकांनीही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून पोलीस दलात स्थान मिळवले आहे. नुकताच या यशस्वी मुलांचा सत्कार सोमेश्वच करखान्यातर्फे घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जेष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक सुनील भगत, आनंदकुमार होळकर, ऋषीकेश गायकवाड, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफने, सचिव कालीदास निकम, अनंत तांबे, किसन तांबे, शांताराम कापरे आदी उपस्थित होते.
