सुपे परगणा l पालक आणि मुले यांच्यातील सुसंवाद वाढणे काळाची गरज -दिनेश आदलिंग

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
नेमकी काय विचार करतात आणि त्यांना कोणत्या अडचणी भेडसावतात, हे पालकांनी शांतपणे समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या बदलत्या जीवनशैलीत पालक आणि मुले यांच्यातील सुसंवाद वाढवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते दिनेश आदलिंग यांनी केले. 
सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचालित इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ' मुलांना समजून घेताना ' या विषयावर दिनेश आदलिंग यांनी व्याख्यान दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील प्राचार्य योगेश पाटील होते.
यावेळी आदलिंग यांनी पालक आणि मुले यांच्यातील वाढत्या अंतरावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "मुलांवर केवळ अभ्यासाचे दडपण न टाकता त्यांच्या आवडी निवडी आणि मानसिक समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या क्षमता ओळखा. पालकांनी मुलांचे मित्र बनण्यापेक्षा पालकच बनून त्यांच्याशी संवाद साधल्यास अनेक अडचणी सहज सुटू शकतात. तसेच विद्यार्थ्यांना असलेले मोबाईलचे व्यसन, एकाग्रतेचा अभाव, मुलांची चिडचिड, राग येणे आणि संवादहीनता आदी विषयांवर आदलिंग यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top