सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील पश्चिम पट्टयातील सुपे येथील हजरत ख्वाजा शहामन्सूर बाबांचा उरूस उत्सव यावर्षी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दर्गा कमेटी ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांची दर्गा आवारात बैठक झाली. यावेळी या बैठकीत स्वर्गीय अजित पवार यांच्या आकस्मित निधनामुळे यावर्षीचा उरूस उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे येथील चार दिवस होणारा उरूस उत्सवात फक्त धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तर सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे संदलच्या वेळी असणारी डिजेची धामधूम दिसणार नाही. तसेच दुसऱ्या दिवशी होणारा लोकनाटय तमाशा, तिसऱ्या दिवशी होणारा कव्वाली कार्यक्रम तर चौथ्या दिवशी होणारा कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
या बैठकीला येथील सरपंच तुषार हिरवे, दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष हमीद डफेदार, उपाध्यक्ष युनूस बागवान, सचिव जमिर काझी, अनिल हिरवे, सुयश जगताप, विलास धेंडे, मल्हारी खैरे, महादेव जगताप, शंकर शेंडगे, सुयश जाधव, दादा चोरमले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान कुतवळवाडीत शुक्रवारी ( दि. १० ), सुपे येथे मंगळवारी ( दि. १४ ) तर वढाणे येथे गुरुवारी ( दि. १६ ) होणारी भैरवनाथ यात्रा साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. यावेळी धार्मिक कार्यक्रम वगळता मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमेटीच्या वतीने देण्यात आली.
