Rajgad Breaking l मिनल कांबळे l गावातील सप्ताहाच्या सांगता मिरवणुकीवर मधमाशांच्या हल्ला : ६५ जण जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताह निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने ग्रामस्थांची  तारांबळ उडाली. या हल्ल्यात ६५ ऊन जखमी झाले असून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

विहीर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाचा सांगता समारंभाचा आज शेवटचा दिवस होता त्यानिमित्त ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेची पालखी संपूर्ण गावात मिरवणुकी काढून काढण्यात आली होती, पालखी सोहळा गावातील मंदिराजवळ आल्यानंतर पालखी जमिनीवर ठेवली असता त्याचबरोबर मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला अचानक हल्ले केल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली लोक सैरावैरा धावू लागले काही लोक मंदिरात बसली काही लोक जवळच्या घरामध्ये आसरा घेतला त्यामुळे वाचली सारे साधारणता या पालखी सोहळ्यात 200 च्या आसपास लोक सहभागी झाले होते, येथील आल्यावर झालेल्या लोकांवर ग्रामीण रुग्णालय वेल्हे या ठिकाणी उपचार सुरू असून काही नको किरकोळ जखमी झाले आहेत, पालखी सोहळा दरम्यान लहान मुलांनी फटाके वाजवल्याने मधमाशांनी हल्ला केल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले, 
To Top