Satara News l ज्यांना स्वतःचे सदस्य सांभाळता येत नाहीत, त्यांनी राजकारणावर बोलू नये; जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंना टोला

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत ज्यांना आपले सदस्य सांभाळता येत नाहीत, त्यांनी राजकारणावर चर्चा करू नये. जे सदस्य भाजपसोबत आले आहेत, ते मनापासून आले आहेत, अशा शब्दांत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 
जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना गोरे म्हणाले की, आमचे प्लॅन ए, बी आणि सी यशस्वीपणे एक्झिक्युट झाले आहेत. 
जर प्लॅन 'डी' राबवला असता, तर जिल्हा परिषदेत आज वेगळेच चित्र पाहायला मिळाले असते. विराज शिंदे आणि कर्णेताई नेमक्या कोणाच्या? हा प्रश्नच सर्व काही स्पष्ट करतो. शंभूराज देसाई यांनी अजून पाच वर्षे बाकी आहेत असा इशारा दिला होता. त्यावर भाष्य करताना गोरे म्हणाले, आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने जिल्हा परिषदेत लोकाभिमुख कारभार केला जाईल. विरोधकांकडून सातत्याने धमक्या देण्याचे काम सुरू आहे, पण आम्ही याला घाबरत नाही. आम्ही बघायलाच बसलो आहोत, काहीही अडचण नाही. 

शक्तिपीठ महामार्गाच्या विषयावर बोलताना जयकुमार गोरे यांनी पालकमंत्र्यांच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "या महामार्गाच्या नवीन आखणीला दोन महिन्यांपूर्वीच कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. एमएसआरडीसीकडून याची आखणी झाली असून हा विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे पालकमंत्र्यांनी 'मला माहिती नाही' असे म्हणणे चुकीचे आहे," असेही त्यांनी नमूद केले.
To Top