Baramati News l राष्ट्रीय स्तरावरील BIS स्पर्धेत वाणेवाडीच्या भाग्यश्री चव्हाणची चमकदार कामगिरी

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्या वतीने दि. २७ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल, वाणेवाडी येथील विद्यार्थिनी भाग्यश्री योगेश चव्हाण हिने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत देशभरातून BIS क्लबचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाग्यश्री हिला या यशाबद्दल रोख स्वरूपात पारितोषिक प्रदान करण्यात आले. तिच्या या घवघवीत यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शैक्षणिक संशोधन व मूल्यमापन अधिकारी आदरणीय किरण देशपांडे, BIS पुणे शाखेचे अधिकारी श्री शुक्ला, रघुनाथ भोसले, संस्थेचे आजीव सदस्य सुनील भोसले, प्रवीण  भोसले,  विक्रम भोसले तसेच वाणेवाडी ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन केले.
याशिवाय शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव, पर्यवेक्षक श्री खरात, BIS समन्वयक सौ. वाबळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही भाग्यश्रीच्या यशाचे कौतुक केले आहे.
To Top