सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) येथील इयत्ता 12 वी विज्ञान (AISSCE 2025-26) तसेच वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला असून दोन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
विज्ञान शाखेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये सार्थकी बाळासाहेब कापरे हिने 91 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अथर्व अमोल वाडकर याने 85.60 टक्के गुणांसह द्वितीय तर वेदांती किरण चाबुकस्वार हिने 73.20 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. विषयानुसार विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयात वेदांती किरण चाबुकस्वार हिने 88 गुण, गणित विषयात सार्थकी बाळासाहेब कापरे हिने 82 गुण, भौतिकशास्त्रात सार्थकी कापरे हिने 78 गुण, रसायनशास्त्रात 92 गुण मिळवले. जीवशास्त्र विषयात अथर्व अमोल वाडकर याने 81 गुण, माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात सार्थकी कापरे हिने शंभरपैकी शंभर गुण मिळवत विशेष यश संपादन केले. कृषी विषयात अथर्व अमोल वाडकर याने 98 गुण मिळवले.
वाणिज्य शाखेतही सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100 टक्के निकाल लागला आहे. स्माइली पृथ्वीराज यादव हिने 85.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. उन्नती भावेश पटेल हिने 84 टक्के गुणांसह द्वितीय तर अलिजा रिझवान पठाण हिने 83.40 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेतील विषयानुसार विशेष यशामध्ये इंग्रजी विषयात स्माइली पृथ्वीराज यादव हिने 89 गुण, अर्थशास्त्र विषयात पृथ्वीराज धनसिंग गावडे याने 80 गुण, बिझनेस स्टडीजमध्ये स्माइली यादव हिने 90 गुण मिळवले. अकाउंटन्सी विषयात पृथ्वीराज गावडे याने 58 गुण, रिटेल विषयात स्माइली यादव व उन्नती पटेल यांनी प्रत्येकी 96 गुण मिळवले. कृषी विषयात अलिजा रिझवान पठाण हिने 93 गुण संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
