सुपे परगणा l कवी हनुमंत चांदगुडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
तालुक्यातील सुपे येथील कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे यांना "आडतास" या कवितासंग्रहासाठी कविवर्य साहित्यमार्तंड यशवंतराव सावंत खास जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 
         या पुरस्काराचे वितरण गुरुवार ( दि. १४ ) छत्रपती शंभूराजेच्या जयंती सोहळ्यात किल्ले पुरंदर येथे होणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रुपये पन्नास हजार असे पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. 
 कवी हनुमंत चांदगुडे यांची तीन पुस्तक प्रकाशित असून त्यांच्या पुस्तकांचा हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे. याचबरोबर चांदगुडे यांच्या तीन कविता अभ्यासक्रमात आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात "बालभारती" इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमात "आळाशी" या कवितेचा समावेश झाला आहे.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला (एफवायबीए ) च्या अभ्यासक्रमात "लेक" या कवितेचा समावेश आहे. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या अभ्यासक्रमात "किनकिन घुंगुराची" या कवितेचा समावेश आहे. चांदगुडे यांना आजवर मराठी भाषा संवर्धन समितीच्या पुरस्कारासह २८ वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांनी अनेक चित्रपट, अल्बम व वेबसिरीजसाठी गीतलेखन केले आहे.
Tags
To Top