सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान , पुरंदर ,महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखा व काकासाहेब पुरंदरे स्मृती प्रतिष्ठान , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत उर्फ काकासाहेब दत्तात्रय पुरंदरे यांच्या नावाने पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष,दै.लोकमतचे पत्रकार सुनील पांडुरंग लोणकर यांना जाहीर झाला आहे.
अशी माहिती आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. पुरंदरे यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या सभागृहात सदरचा पुरस्कार वितरण समारंभ दैनिक लोकमत पुणे संपादक ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या शुभहस्ते होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ५ वे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद , सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड .दिलीप निरगुडे यांनी केले आहे.
