Baramati News l मृणालिनी चव्हाण यांना पीएचडी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
जिद्द, चिकाटी आणि शिक्षणावरील निष्ठेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सोमेश्वरनगर-वाघळवाडी येथील मृणाली भानुदास चव्हाण यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. 
         सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून त्यांना ‘इलेक्ट्रॉनिक सायन्स’ विषयात डॉक्टरेट प्रदान करण्यात आली असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या त्या Abasaheb Garware College येथील डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्समध्ये संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी “Design and Development of an Electronic System for the Detection of Pesticide Residue on Edible Fruits” या विषयावर संशोधन केले. खाद्य फळांवरील कीटकनाशकांच्या अवशेषांचा शोध घेणारी इलेक्ट्रॉनिक प्रणाली विकसित करण्यावर आधारित असलेल्या या संशोधनाचे सायंटिफिक जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रकाशित झाले असून संबंधित पेटंटही ग्रँट झाले आहे.

या संशोधनासाठी त्यांना Dr. Deepa Ramane, Dr. Arvind Shaligram, Dr. Tukaram Dongale यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच Dr. Rajneesh Kamat यांचे विशेष सहकार्य लाभले. मृणाली यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये SET परीक्षा तसेच २०२१ मध्ये UGC-NET परीक्षा उत्तीर्ण केली होती. पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत (PET) यश मिळवल्यानंतर त्यांची संशोधक विद्यार्थी म्हणून निवड झाली होती.
To Top