Bhor Breaking l पुणे-सातारा महामार्गावर अपघातात अपघात : अपघातात पलटलेल्या कंटेनरखाली दबून चालकाचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
मुंबई (भिवंडी )येथून पुणे- सातारा महामार्गावरून शिरवळकडे मालवाहतूक जाणाऱ्या कंटेनरचा केळवडे ता.भोर हद्दीत पलटी होऊन अपघात झाला.या अपघातात पलटलेला कंटेनर चालकाच्या अंगावर पडल्याने चिखलगाव ता.भोर येथील चालक हनुमंत शंकर धोंडे (वय - ५२) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.१७ पहाटे घडली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा कंपनीचा कंटेनर( एमएच ११सीएच २४ ९९ )मुंबईहून माल भरून शिरवळ कडे येत असताना केळवडे जवळ पलटी झाला. कंटेनर पलटी होताना चालकाने डंपर मधून उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र चालक पलटी झालेल्या डंपरखाली सापडल्याने गंभीर जखमी पवन मृत पावला.मृत चालक आंबवडे खोऱ्यातील चिखलगाव ता.भोर येथील तरुण सामाजिक कार्यकर्ता असल्याने चिखलगाव परिसरात चालकाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

To Top