सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टरच्या वर्धापन दिन सोहळ्यात छोटा जय जगदाळे याने चक्क Ajit Pawar यांच्या हुबेहूब स्टाईलमध्ये वेशभूषा करून एन्ट्री केल्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. “रुबाब तोच, स्टाईलही तीच!” अशा शब्दांत उपस्थितांनी जयचे कौतुक केले असून, सध्या त्याच्या या कडक लूकचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सोमेश्वर रिपोर्टरच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये झालेल्या बालसंस्कार व वेशभूषा स्पर्धेत जय जगदाळे याने पांढरा शुभ्र कुर्ता-पायजमा, नेहरू जॅकेट आणि अजितदादांची सिग्नेचर पोझ हुबेहूब साकारली. जयचा मंचावरील आत्मविश्वासपूर्ण वावर पाहून उपस्थित मुख्य पाहुणे आणि नागरिकही थक्क झाले. विशेष म्हणजे, जयने केवळ वेशभूषाच नव्हे तर चालण्याची शैली, हातवारे आणि चेहऱ्यावरील भावदेखील अगदी अजितदादांसारखे साकारल्याने कार्यक्रमात एकच जल्लोष झाला. जय जगदाळेचा हा फोटो सध्या संपूर्ण पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे.
