भोर l घरकुलाचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी १५ हजारांची लाच; ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..!

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील महुडे खोऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. १९) मोठी कारवाई करत ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
           मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिंद व गवडी (ता. भोर) गावांचे ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे (रा. बारामती) यांनी एका घरकुलधारकाकडून घरकुल योजनेचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली होती. संबंधित तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. भोलावडे – शिंद रस्त्यावर १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक सालगुडे यांना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
Tags
To Top