Baramati News l बारामतीत धक्कादायक घटना; १२वीत शिकणाऱ्या १८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे शनिवारी (३० मे) पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली. १२वीत शिक्षण घेत असलेल्या वरद दत्तात्रय निंबाळकर (वय १८) या युवकाने घरातील बेडरूममध्ये पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरद हा दररोजप्रमाणे सकाळी जिमला जाण्यासाठी उठला होता. त्याचे वडील दत्तात्रय निंबाळकर यांनी त्याला पहाटे साडेपाचच्या सुमारास उठविले. त्यानंतर तो वॉशरूमला गेल्याचे दिसून आले. मात्र बराच वेळ होऊनही तो खाली न आल्याने वडिलांनी त्याच्या खोलीकडे जाऊन पाहिले असता, वरदने पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती तत्काळ करंजेपुल पोलीस चौकीला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन गळफासाची साडी कापून वरदला खाली घेतले. मात्र त्यावेळी त्याची कोणतीही हालचाल नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे करंजेपुल परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत
To Top