सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात रूट मार्च काढला.
बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांचा एक महत्त्वाचा सण आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अनेक गावात हा सण उत्साहात साजरा केला जातो.
तसेच या परिसरात हिंदू मुस्लिम धर्मीय एकोप्याचे वातावरण पाहायला मिळते. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांच्या ऑफिस कर्मचाऱ्यांनी वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक या गावात रूट मार्च काढला.
