Baramati News l आठ महिन्यांच्या गरोदर महिलेला मारहाण; पैसे वसुलीसाठी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पैसे वसुलीच्या कारणावरून एका ८ महिन्यांच्या गरोदर महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमेश्वरनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
          मिळालेल्या माहितीनुसार, तुमच्या नवऱ्याकडे आमचे ७,००० रुपये आहेत, असे म्हणत आरोपींनी तक्रारदार महिलेला गाठले. यावेळी महिलेचा हात धरून तिला जबरदस्तीने गाडीत ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुला रानात नेऊन बसवतो, मग तुझा नवरा पैसे घेऊन येईल, अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली. या प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरली आणि मोठमोठ्याने रडू लागली. गरोदर असल्याची माहिती देऊनही अमानुष वागणूक महिलेजवळ असलेले ४,४०० रुपये तिने आरोपींना दिले, मात्र "पैसे कमी आहेत" असे म्हणत आरोपींनी तिला कानाखाली मारून शिवीगाळ केली. पीडित महिला ८ महिन्यांची गरोदर असल्याचे आणि तिची लहान मुलगी रडत असल्याचे सांगूनही आरोपींनी तिला मारहाण करणे सुरूच ठेवले. या मारहाणीनंतर महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला तातडीने लोणंद येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी खालील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पवन संतोष शिंदे, अनुराग संतोष शिंदे, विनोद बाळासो भगत, विकास बाळासो भगत, संतोष रंगनाथ शिंदे, आशा संतोष शिंदे आरोपींविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, धमकी देणे आणि महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोपोउनी वारुळे करत आहेत.
To Top