Rajgad News l नसरापुर अत्याचार प्रकरणाचा निषेध; वेल्हे बाजारपेठ कडकडीत बंद, आरोपीला फाशीची मागणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
भोर तालुक्यातील नसरापुर येथे घडलेल्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्येच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ वेल्हे येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवत तीव्र संताप व्यक्त केला.
       नसरापुर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर एका साठ वर्षीय नराधमाने अत्याचार करून अमानुषपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेनंतर आरोपीने मुलीचा मृतदेह गाईच्या गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याचा निषेध करत वेल्हे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी जोरदारपणे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात विविध महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच प्रशासन एकवटले असून आरोपीविरोधात तातडीने कडक कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.
To Top