Bhor Breaking l अपघातानंतर मदतीऐवजी पळ काढला; नारायणपूर-कापूरहोळ रस्त्यावर सेवेकऱ्याचा दुर्दैवी अंत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
नारायणपूर येथील श्री दत्त महाराजांचा सेवेकरी गुरुवार दि.२१ मंदिरातील सेवा उरकून दुपारच्या दरम्यान घरी परतत असताना एक्टिवा गाडीला बुलेट या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली.सेवेकरी धोंडीबा मालू हिवरे (वय- ५५) रा.जांभळी ता.वाई रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी होऊन वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
      स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणपूरचे सेवेकरी धोंडीबा हिवरे नारायणपूरवरून मंदिरातील सेवा संपवून रस्त्यावरील दुसऱ्याच्या चालू दुचाकीने कापूरहोळ (ता.भोर) बाजूकडे येत होते.दरम्यान हिवरे बसलेली एक्टिवा दुचाकी नारायणपूर- कापूरहोळ मार्गावरील दिवडी (ता.पुरंदर) गावच्या हद्दीत पाणी पिण्यासाठी थांबत असताना पाठीमागून येणाऱ्या लाल कलरच्या बुलेटने एक्टिवावर पाठीमागे बसलेल्या धोंडीबा हिवरे यांना जोरदार धडक दिली.यात हिवरे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.घटना घडताच दोन्ही दुचाकीस्वार भीतीपोटी पसार झाले.
तर घटनास्थळाच्या दोन्ही बाजूस एक किलोमीटर अंतरावर फोनला नेटवर्क नसल्याने अपघातग्रस्ताला मदत मिळाली नसल्याने हिवरे यांच्यावर उपचार करण्यास विलंब झाला असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

माणुसकीला काळीमा
एक्टिवा दुचाकी चालकाने धोंडीबा हिवरे यांना नारायणपूरहून भोरबाजूकडे येण्यासाठी लिफ्ट दिली होती. एक्टिवा चालक व धोंडीबा हिवरे पाणी पिण्यासाठी देवडी गावच्या हद्दीत थांबत असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या बुलेटने त्यांना जोरदार धडक दिली.या घटनेत धोंडीबा हिवरे गंभीर जखमी झाले. मात्र भीतीपोटी दोन्ही दुचाकीस्वार अपघातग्रस्ताला उपचारासाठी मदत न करता पसार झाल्याने तसेच मोबाईलला नेटवर्क नसल्याने हिवरे यांना उपचार मिळण्यास विलंब झाला.दुचाकीस्वार भीतीपोटी पळून गेल्याने ही माणुसकीला काळीमा फासणारा घटना असल्याचे रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहन चालकांकडून सांगण्यात आले.
Tags
To Top