Murud-Janjira l काशिद बीचवर बुडणा-या पर्यटकाला जीवदान ! रोबोटिक बोयो ठरला देवदूत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मुरुड जंजिरा : बाबुराव गोळे
पर्यटनात उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुरुड तालुक्यातील काशिद बीचवर आलेल्या पर्यटक समुद्रात बुडत असताना,रोबोटीक बोयो या यंत्राच्या मदतीने पर्यटकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले ,यात स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाचे मोलाचे योगदान राहिले.
     आज शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.त्यांना वाचवण्यासाठी रोबोटीक बोयो देवदूत ठरल्याची प्रतिक्रीया उमटत असून, आतापर्यंत तीन हून अधिक पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
  याबाबत सविस्तर वृत्त समजते कि, पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे (20) ही तरुणी अचानक समुद्रातील पाण्याच्या प्रवाहात खोल पाण्यात ओढली जाऊ लागली. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आली. यावेळी समुद्रकिनारी असलेले पोलीस शिपाई प्रविण रोटकर आणि पोलीस शिपाई जितेंद्र माने यांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या पोलीस कर्मचाऱ्यांनी वॉटरक्राफ्टच्या (रोबोटिक बोयो) मदतीने वेगाने समुद्रात धाव घेतली. पाण्यात बुडणाऱ्या सिद्धी साबळे या तरुणीला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
To Top