Bhor News l विकास कामात राजकारण आणले तर सडेतोड उत्तर देऊ : नगराध्यक्ष रामचंद्र आवारे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
 मागील तीन महिन्यांपासून विरोधक विकास कामांंबाबत अर्जावर अर्ज देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भोर शहराचा विकास हाच ध्यास मनी असताना भाजपाचे नगरसेवक जाणून बुजून त्रास देऊ लागले आहेत.शहराच्या विकासासाठी आलेला ८ कोटी ८० लाखांचा निधी थांबवण्याचे काम विरोधकांनी केले आहे. त्यामुळे विकास कामांना गती मिळत नाही. शहराच्या विकास कामात राजकारण आणले तर सडेतोड उत्तर देऊ असे विरोधकांवर सडकून टीका करीत नगराध्यक्ष रामचंद्र आवारे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
            शहरातील विकास कामांचा निधी विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्याने थांबला गेला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत माहिती देताना नगराध्यक्ष आवारे गुरुवार दि.२१ बोलत होते.
यावेळी गटनेते केदार देशपांडे,नगरसेवक कुणाल धुमाळ,अनिल भेलके,शहराध्यक्ष संदीप शेटे,सोमनाथ ढवळे,अतुल काकडे,हनुमंत कंक,अमित जाधव उपस्थित होते.गटनेते देशपांडे पुढे बोलताना म्हणाले विरोधकांनी किती मोठा विकास कामांच्या बाबतीत विरोध केला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक विकास केल्याशिवाय राहणार नाहीत.भोर शहरात विकास हरवला आहे तर अवैद्य धंदे जिंकले आहेत.विरोधकांनी आमच्या बरोबरीने विकास निधी आणायची कामे करावीत विकास खुंटवायची कामे करू नयेत.भोर शहरातील सुज्ञ जनतेला माहित आहे विकास कामांसाठी निधी कोण आणत आहे आणि विकास कामाला आलेला निधी कोण थांबवत आहे.जनतेच्या विकासासाठी कायम कटीबद्ध राहणार आहोत.
Tags
To Top