सुपे परगणा l सुपे पोलीस स्टेशनच्या कार्यतत्पतेमुळे मुलगी आईच्या कुशीत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम वरून मैत्री झाल्याने मुलगी मित्राला भेटण्यासाठी दोन दिवस बारामती बस स्थानकावर राहिली. मात्र मित्र न भेटता बाबुर्डी तील महिलेने मुलीला सुपे पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यामुळे सुपे पोलीस स्टेशनच्या कार्यतत्परतेमुळे मुलगी आईच्या कुशीत विसावल्याची घटना शुक्रवारी ( दि. २२ ) सुपे ( ता. बारामती ) येथे घडली. 
       मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील मुलीची इंस्टाग्राम वरून बारामती येथे राहत असलेल्या मुलाची मैत्री झाली. तो मुलगा करमाळा तालुक्यातील रहिवासी आहे, मात्र का कामानिमित्ताने बारामती येथे वास्तव्यास आहे. इंस्टाग्राम वरून चॅटिंग करत असताना माझे बारामतीत कापड दुकान असल्याचे सांगितले. त्यामुळे ती मुलगी आपले घरदार सोडून बारामती येथे आली. 
        बारामती बस स्थानकावरून त्या मुलाचा फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ती मुलगी बारामती बस स्थानकावर दोन दिवस राहिली. यावेळी बाबुर्डी येथील एका महिलेच्या संपर्कात आली. त्या महिलेने तू कोणाची आहे असे विचारला असता माझे मामा बारामतीत असून मी त्यांना भेटायला आले असल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर बाबुर्डी येथील महिलेने तिच्या फोनवरून त्याच्याशी संपर्क साधला असता, फोन उचलला जात नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्या मुलीला बाबुर्डी येथे घरी आणले. 
         त्यानंतर त्या महिलेने बाबुर्डी येथील पोलीस पाटील यांची संपर्क साधून संबंधित घटनेची माहिती त्यांना दिली. पोलीस पाटलांनी त्या मुलीला पोलीस स्टेशनला घेवुन गेले. पोलिसांनी अधिक माहिती मुलीला विचारली असता बारामतीत कुठल्याही मामा नसल्याचे निर्दशनास आले. तर इंस्टाग्राम वरून मैत्री झालेला मुलगा असल्याचे समजले. त्यानंतर सुपे पोलिसांनी पंढरपूर येथील मुलींच्या आईशी संपर्क साधून मुलीला ताब्यात दिले. सुपे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळल्याने सुपे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
           ....................................
To Top