सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील जयराम भिवा लकडे यांचे आज पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ६५ वर्षाचे होते. करंजे ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे ते संचालक होते.प्रतिकूल परिस्थितीत आपल्या रणजीत व विक्रम या दोन्ही मुलाना शिकवून सैन्यामध्ये त्यांनी भरती केले होते. विक्रम लकडे नुकताच सेवानिवृत्त झाला तर रणजीत लकडे अद्याप सैन्यदलात देशसेवा करीत आहे.त्यांचे मागे त्यांची पत्नी सविता दोन मुले व सुना असा परिवार आहे.
करंजेपुल ग्रामपंचायती मधे देखील त्यांची पत्नी सदस्य म्हणून होती.विविध सामाजिक संस्थावर त्यांनी काम केले. पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या ते चुलते होत.
