Pune Crime l येरवड्यात रस्त्यावर वाढदिवस साजरा; माजी नगरसेवकासह सात जणांवर पोलिसांचा गुन्हा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुणे : प्रतिनिधी 
पुणे येरवडा परिसरात मध्यरात्री रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करणे भाजपच्या माजी नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी माजी नगरसेवक किशोर राजाराम विटकर यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये किशोर राजाराम विटकर (वय ५१), हर्षद किशोर विटकर (वय २८), गणेश पोपटराव ढोकळे (वय ४०), गणपत जिवराज पुरोहित (वय ५१), विकास मच्छिंद्र सोनवणे (वय ४०), रोहित मधुकर वैराळ (वय ३५, सर्व रा. येरवडा) तसेच रामेश्वर अरुण दुर्लेकर (वय ३२, रा. वाघोली) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी बलजीत थोरात यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर विटकर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील गाडीतळ परिसरातील विटकर यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारी (२२ मे) मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर टेबल टाकून वाढदिवसाचा केक कापण्यात आला. तसेच रात्री एकच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
Tags
To Top