Purandar News l मनोहर ताथवडकर यांची बॉक्सिंग आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
सासवड (ता. पुरंदर) येथील बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय अधिकारी व राष्ट्रीय पंच मनोहर ताथवडकर यांची बॉक्सिंग आंतरराष्ट्रीय पंच स्टार -2 पदी निवड झाल्याबद्दल सासवड पोलीस स्टेशन व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मनोहर ताथवडकर यांचा सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.
      यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष दत्ता भोंगळे, सरचिटणीस सुनील लोणकर, राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख ईश्वर बागमार, शिवाजी मोकाशी आदी उपस्थित होते. सागी रामकृष्ण राजू ट्राफी 2026 भिमावरम आंध्र प्रदेश येथे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 18 ते 22 मार्च 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय पंच शिबीरामध्ये ताथवडकर यांनी भाग घेतला होता. यादरम्यान झालेल्या परिक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यतून मनोहर ताथवडकर यांनी 90 पेक्षा जास्त गुण मिळवून आंतरराष्ट्रीय पंच ( रेफ्री आणि जज) परिक्षा पास करुन महाराष्ट्र राज्याचे व भारत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पंच स्टार -2 हा बहुमान मिळाला आहे. स्वित्झर्लंड येथून या निकालाची घोषणा झाली आहे.

 मनोहर ताथवडकर हे अखिल महाराष्ट्र हौशी मुष्टीयुध्द असोसिएशनचे सरचिटणीस असून 2010 कामनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी तांत्रिक अधिकारी म्हणून त्याचप्रमाणे अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये पंच म्हणून तसेच 2025 साली अशियन बॉक्सिंग चॅम्पियन शिप कोलम्बो श्रीलंका येथे सहभाग होता.
To Top