Purandar News | पुरंदर तालुका छावा संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप फडतरे

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
बोपगाव (ता. पुरंदर) येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप अनंता फडतरे यांची अखिल भारतीय छावा संघटनेच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
            यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, कार्याध्यक्ष प्रेम भुरे, राहुल फडतरे, विजय जगदाळे आदी उपस्थित होते. संदीप फडतरे यांच्या निवडीबद्दल परिसरातून अभिनंदन करण्यात येत असून सामाजिक व संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.
To Top