Purandar News l ३३ वर्षांनी पुन्हा जुळले मैत्रीचे धागे; भिवरीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
 शाळेचे व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या निवडलेल्या क्षेत्रात करिअरसाठी जातात. शालेय जीवनात एकत्र भेटलेले विद्यार्थी कधी भविष्यकाळात भेटतील याची शाश्वती नसते. परंतु पुरंदर तालुक्यातील पुरंदर ज्युनिअर कॉलेज येथे १९९२ साली १२ वी वाणिज्य शाखेमध्ये शिकलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी तब्बल ३३ वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळावा साजरा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

      यावेळी त्याकाळी शिकवलेल्या गुरुजनांचे स्वागत करून सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सकाळी पुरंदर जूनियर कॉलेजमध्ये एकत्रित जमून त्या काळात घालवलेल्या सुखद क्षणांच्या आठवणी जाग्या केल्या. त्यानंतर भिवरी येथे ग्रॅड पुरंदर येथे स्नेहमेळावा संपन्न केला. सर्वांनी शिक्षण व शिक्षकांप्रती भावना व्यक्त केल्या. यावेळी पुरंदर कॉलेजचे निवृत्त प्रा. केशव काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे प्रा. लक्ष्मण टिळेकर, प्रा. सचिन लोखंडे, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा.विठ्ठल गवते, प्रा. पांडूरंग वाघमोडे आदी शिक्षक उपस्थित होते  

        विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह्.भ.प‌ दत्तात्रय कि. कटके, तानाजी खटाटे, संजय कटके, संदिप भिंताडे, सतीश शिंदे, संदिप जगताप, राजेंद्र आकारशे, भाऊसाहेब कोलते, सुधाकर देवकर, राजेंद्र इनामके, दत्तात्रय गिरमे, जितेंद्र दाते, संजय काळे, गोकुळआप्पा क्षीरसागर, राजेंद्र जगताप, सुरेश चव्हाण ,संतोष गिरमे, आप्पा काळे, सविता कुंजीर, जयश्री जाधव, अलका कोलते, उर्मिला गायकवाड, रोहिणी पांडे, वैशाली डफळ, दिपाली काळे, मालन बारवकर, विद्या कटके, मंगल नेवसे, पुष्पा तापकीर,सविता खटाटे आदी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक सुधाकर देवकर यांनी केले‌. सूत्रसंचालन हे.भ.प. दत्तात्रय कटके यांनी केले 
     यावेळी दिवंगत उत्तमराव शिंदे, सुधीर जगताप, अनिल रणनवरे यांना श्रद्धांजली अर्पण करून माजी विद्यार्थ्यांनी आपला उद्योग नोकरी व्यवसाय व प्रगतीविषयी माहिती देत ऋणानुबंधाचे नाते जोपासण्याचा संकल्प केला. माणुसकीचे दर्शन 'एकमेका विषय असलेले आदराची भावना, एक नवीन ऊर्जा व प्रेरणा सर्वांना मिळाली. 'विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी व सर्व गुरु यांच्यात प्रेम व एकतेचे नाते निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. प्रा. केशव काकडे यांनी असे कार्यक्रम वरचेवर घेतल्याने जीवन जगण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते असा संदेश दिला.

माझे विद्यार्थी कधीच कुठे कमी पडणार नाहीत, ते चांगल्या प्रगतीपथावर आहेत यात आमचे जीवनाचे मोठं सार आहे. मोठे व्हा आणि चांगले नाव कमवा अशा शब्दात शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. स्नेहमेळाव्यात एकमेकांच्या भेटीगाठी बरोबर अनेक आठवणींचा ठेवा उराशी बाळगून परत भेटण्याचा संकल्प करत सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला
To Top