Rajgad Breaking l पानशेत धरणात बुडून जुन्नर येथील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील पानशेत धरणामध्ये आज पुन्हा एकदा अडीच वर्षे युवकाचा बुडून मृत्यू झाला असल्याची तक्रार राहुल राजेश पोलास यांनी दिली,असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की पानशेत धरणामध्ये आठ ते दहा जणांचा ग्रुप फिरण्यासाठी गेला होता पानशेत धरणाच्या कॅनॉल मध्ये एक युवक पोहण्यासाठी गेला होता, 
पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसेच पाणी खोल असल्याने त्याला दम लागून पाण्यात बुडून संदीप तन्मय शेठे (वय २२) राहणार आगर सुसरबाग जुनी एसटी स्टँड जुन्नर याचा मृत्यू झाला, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीम मधील तानाजी भोसले यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या 45 मिनिटात मृतदेह पाण्याचा बाहेर काढला, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोघे अधिक तपास करीत आहेत
To Top